Banglore

वाल्मिकी महामंडळ घोटाळ्यात माझी चूक नाही : माजी मंत्री बी. नागेंद्र

Share

वाल्मिकी महामंडळ घोटाळ्यात माझी काहीही चूक नाही, याप्रकरणी विरोधकांकडून काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांवर दबाव आणून ईडीकडून छळ केला जात असल्याचा आरोप माजी मंत्री बी. नागेंद्र यांनी केला.

वाल्मिकी विकास महामंडळाचे पैसे अवैधरित्या हस्तांतरित केल्याप्रकरणी परप्पन अग्रहार तुरुंगात असलेले काँग्रेसचे आमदार बी. नागेंद्र यांना आज जामिनावर सोडण्यात आले असून आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना उपरोक्त विधान केले.

बी नागेंद्र पुढे म्हणाले, वाल्मिकी महामंडळ घोटाळ्यात माझी कोणतीही चूक नसताना मला अटक करण्यात आली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी 3 महिन्यांपासून छळ केला. माझ्यावर दबाव आणून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेऊन आपला छळ करण्यात आला. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या दबावाखाली हा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी विनाकारण आमच्या सरकारला गोवण्याचे काम करण्यात आले असून केंद्र आणि भाजप आमचे सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत. काँग्रेस केंद्राच्या कोणत्याही धमक्यांना घाबरत नाही, असा टोला त्यांनी लगावला.

काँग्रेस सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांनी हे केले आहे, माझा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे, आता मी बाहेर आलो आहे. एसआयटीचे अधिकारीही ईडी, सीबीआयपेक्षा कमी नाहीत. ईडीच्या अधिकाऱ्यांनी हेतूपुरस्सर काम केल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.

Tags: