प्रख्यात डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्या आणि कर्नाटक राज्य भाजपा महिला मोर्चाच्या सचिव डॉ. सोनाली सरनोबत यांना प्रतिष्ठित वुमन ऑफ इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
बेळगाव येथील प्रसिद्ध डॉक्टर, सामाजिक कार्यकर्त्या आणि कर्नाटक राज्य भाजपा महिला मोर्चाच्या सचिव डॉ.सोनाली सरनोबत यांना मुंबईतील वांद्रे , कुर्ला कॉम्प्लेक्स येथे आयोजित समारंभात राष्ट्रीय शेअर बाजारातील प्रतिष्ठित वुमन ऑफ इम्पॅक्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ अभिनेत्री स्मिता जयकर, लागू बंधू ज्वेलर्सचे अध्यक्ष दिलीप लागू आणि प्रिमियम ब्रँड बागिटच्या मालक नीना लेखी आणि कार्यक्रम समन्वयक रचना भागवे उपस्थित होते.
नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे एमडी आणि सीईओ आशिष कुमार चौहान, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments