Belagavi

ऑनलाइन बेटिंग गेमवर बंदी घाला : नम्म कर्नाटक सेनेची मागणी

Share

” नम्म कर्नाटक सेने ” ने ऑनलाईन बेटिंग गेमवर बंदी घालण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले.

यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष इरफान अत्तार यांनी संपूर्ण देशाच्या अस्तित्वासाठी, विद्यार्थ्यांच्या जीवनासाठी , , देशवासीयांच्या कुटुंबीयांसाठी आता आम्ही शांतातेच्या मार्गाने आंदोलन आणि प्रबोधन करत आहोत. जर तुम्ही जागे झाले नाही. तर सट्टेबाजीची कार्यालये फोडून टाकू , असा कडक इशारा त्यांनी प्रसारमाध्यमांद्वारे दिला.

यावेळी जिल्हा पदाधिकारी गंगाधर दोडमणी, बाळाराम विल्सन मारिहाळ, गणेश दोडमणी , मंजू कलकुटगी , जैद कित्तूर , प्रवीण भुतिया , कस्तुरी भावी आदी उपस्थित होते.

Tags: