23 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत 200 वा कित्तूर उत्सव साजरा करण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासनाने जोरदार तयारी केली असून यावेळी कित्तूरसह काकती आणि बेळगावी येथे विशेष कार्यक्रम होणार असल्याचे बेळगावचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी सांगितले.
ते आज माध्यमांशी बोलत होते. यावर्षीचा 200 वा कित्तूर उत्सव 23 ते 25 ऑक्टोबर या कालावधीत साजरा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सर्व तयारी केली आहे. हा कार्यक्रम कित्तूर किल्ल्यावर होणार आहे. यासाठी 21 समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. शासनाच्या ५ कोटी रुपयांच्या अनुदानातून हा महोत्सव होत आहे. तीन दिवस रासमंजरीचा कार्यक्रम होणार आहे. 25 रोजी काकती व बेळगाव येथेही कार्यक्रम होणार आहे. साधू कोकीळ, कुणाल गांजावळला यांचा कार्यक्रम सादर होणार आहे . कित्तूर कार्यक्रमात सारेगमप टीम आणि विजयप्रकाश आणि अरमान मल्लिक यांचे सादरीकरण होणार आहे.
यंदा खास एअर शोचा कार्यक्रम होणार आहे. यासंदर्भात भारत सरकारच्या मुख्य सचिवांना यापूर्वीच पत्र लिहिले आहे. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांशी सल्लामसलत करून एअर शो आयोजित केला जाईल. तसेच खाद्य महोत्सव आणि जलक्रीडा होणार आहे. उद्घाटनासाठी राष्ट्रीय खेळाडूंना आमंत्रित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी प्रोबेशनरी आयएएस अधिकारी दिनेश मीना उपस्थित होते.
Recent Comments