Hukkeri

हुक्केरी नगरपालिकेने हटवले अन्य भाषेच्या नेमप्लेट्स

Share

शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता , अन्य भाषेत लावण्यात आलेले दुकानांवरील नामफलक हुक्केरी नगरपालिकेकडून हटवण्यात आले . हुक्केरी येथे काही आस्थापनांनी कन्नडचा वापर न करता अन्य भाषेतून नामफलक लावले होते . सरकारी आदेशाचे होणारे उल्लंघन पाहून , पालिकेने अनेक दुकानांचे फलक, दुकानांसमोरील फलक हटवले आहेत.

बोर्डात ७०% कन्नड असायला हवे. आणि सरकारने प्रत्येक व्यावसायिक दुकानावर कन्नड भाषेत दुकानाचा फलक असावा असा आदेश काढला होता. अनेक दुकानांनी याचे पालन न करता इंग्रजी नामफलक आपल्या दुकानांवर लावले होते . . इतर काहींनी आपले नाव , कोपऱ्यात कुठेतरी कन्नडमध्ये टाकले होते आणि इंग्रजी भाषेतील नावाचा मोठा फलक लावला होता. असे फलक हटविण्याच्या पालिकेच्या कामाचे कन्नडिगांनी कौतुक केले आहे.

पालिकेने सर्व दुकानांना एक आठवड्याची मुदत दिली असून, त्या वेळेत कन्नड नामफलक लावावेत अन्यथा दुकानाचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

Tags: