सणासुदीचे दिवस सुरु आहेत . नवरात्र , दसरा , दिवाळी असे सण पाठोपाठ येतात . या सणांदरम्यान होणाऱ्या पूजेसाठी , झेंडू , विविध प्रकारच्या शेवंती आणि अन्य फुलांना मोठी मागणी असते . मात्र अचानक आलेल्या पावसामुळे फुलांची अवाक कमी झाल्याने , मार्केटमध्ये फुलांचे दर वाढले आहेत .
सणावाराच्या निमित्ताने फुलांच्या बाजारपेठेत देखील मोठी उलाढाल होते . पूजेसाठी लागणारे झेंडू शेवंती , गुलाब , आदी फुलांची आवक पावसामुळे मंदावली आहे . परिणामी बाजारपेठेत फुलांचे दर वाढले आहेत . नवरात्र दसरा उत्सवात मोठ्या बेळगावातून फुलांची उलाढाल मोठ्या प्रमाणावर होते .
बेळगाव येथील होलसेल फुल मार्केट मधून दररोज कोट्यावधींची उलाढाल होते . बेळगावसहित अन्य राज्यात देखील ही फुले पाठवली जातात . मात्र अचानक सुरु झालेल्या पावसामुळे फुलांची अवाक कमी होऊन दर वाढले आहेत .
यासंबंधी माहिती देताना फुलांचे व्यापारी विशाल पाटील यांनी सांगितले कि , उत्तर कर्नाटकातील बेळगावचे फुल मार्केट हे मोठे मार्केट आहे . कोकणासह , गोवा आणि अन्य ठिकाणी या ठिकाणाहून विविध नमुन्याचा फुले पाठवली जातात . पावसामुळे फुलांची आवक घटली असून दर वाढले आहेत शेवंती , लाल पिवळा झेंडूचे दर किलोमागे ५० ते १०० रुपयांनी वाढले आहेत एकंदर या दसरा सणाला लोकांना अधिक दराने फुले खरेदी करावी लागणार आहेत .
Recent Comments