बेळगाव हे सांस्कृतिक शहर आहे. अनेक वर्षांचा वारसा आजपर्यंत चालवणारे शहर. नवरात्रीनिमित्त श्री दुर्गा माता दौडच्या माध्यमातून देशाची संस्कृती आणि राष्ट्रभक्ती जतन करण्याचे कार्य येथील तरुणांनी सुरू ठेवले आहे. नवंरात्रीच्या निमित्ताने , भद्रकाली मातेच्या पूजनाने आज श्री दुर्गामातेचा 7 वा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देव देश आणि धर्म जागृतीचा संदेश देत बेळगावात यावेळेसही श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २६ व्या वर्षीची अखंड श्री दुर्गामाता दौड आयोजित करण्यात येत आहे. नवरात्रीच्या 7 व्या दिवशी नेहरू नगर येथील बसवन मंदिर येथून भद्रकाली अवताराच्या पूजनाने श्री दुर्गामाता दौडचा प्रारंभ झाला.
श्री दुर्गामाता दौडची सुरुवात प्रेरक मंत्राने धर्मध्वज फडकावून करण्यात आली . प्रत्येक गल्ली नववधूसारखी सजली होती. दौडमध्ये विजयाच्या विविध घोषणा देण्यात आल्या . सुवासिनींनी आरती करून दौडचे स्वागत केले. आबालवृद्धांनी भगवे फेरे , पांढऱ्या रंगाच्या वेशभूषा करून दौडीत सहभाग घेतला . बाळ शिवाजी , माता भवानी , छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंत रूपकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले, यावरी धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
नेहरू नगर येथील बसवाण मंदिर येथून दौडीचा प्रारंभ झाला . सदाशिव नगर, हरिद्रा गणेश मंदिर रोड, आंबेडकर नगर, गणेश चौक, मार्ग मंदिर, रामदेव हॉटेल, गॅंगवाडी, दुर्गामाता रोड, राम नगर, अशोक नगर, सुभाष नगर, जोतिबा मंदिर येथून सुरू होऊन शिवबसव नगर येथे दौडीची सांगता करण्यात आली . सदाशिव नगर येथील प्रमिला पाटील यांनी इन न्यूजला सांगितले की, दुर्गामाता दौड हे नवरात्रीमध्ये विशेष आहे, अनेक वर्षांपासून दुर्गा दौड साजरी केली जात असून दौडीतून आपला सांस्कृतिक वारसा जपला जातो.
उद्या आठव्या दिवशी , धर्मवीर संभाजी चौक येथून दौडीचा प्रारंभ होणार आहे . किर्लोस्कर रोड , रामलिंग खिंड गल्ली , अशोक चौक , बसवणं गल्ली लक्ष्मी मंदिर , नरगुंदकर भावे चौक , गणपत गल्ली , कडोलकर गल्ली , बुरुड गल्ली , भातकांडे गल्ली ,मेनसे गल्ली , आझाद गल्ली , टेंगिनकेरी गल्ली , भोई गल्ली , गणपत गल्ली , पांगुळ गल्ली , टेंगिनकेरी गल्ली , कामत गल्ली , पी बी रोड, मार्केट पोलीस स्टेशन , शेट्टी गल्ली , भडकलं गल्ली , कोर्ट कॉर्नर सरदार ग्राउंड रोड , सन्मान हॉटेल , कॉलेज रोड, यंदेखुट , किर्लोस्कर रोड, कडोलकर गल्ली , बापट गल्ली , संयुक्त महाराष्ट्र चौकातील मारुती मंदिरात दाऊदची सांगता होणार हाये .
Recent Comments