Belagavi

डॉ. किरण आर नायक निर्दोष : उच्च न्यायालयाकडून फेरनियुक्तीचा आदेश

Share

बेळगावचे जिल्हा कमांडंट राहिलेले डॉ. किरण आर नायक यांना कर्नाटक सरकारच्या गृह विभागाने खोट्या आरोपावरून सेवेतून निलंबित केले होते, डॉ. किरण नायक यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचे सिद्ध झाल्याने उच्च न्यायालयाने त्यांची फेरनियुक्ती करण्याचे आदेश दिले

2023 मध्ये होमगार्ड विभागाचे काही कर्मचारी व अधिकाऱ्यांनी आपली चूक लपवण्यासाठी बेळगाव जिल्ह्यातील होमगार्ड विभागाचे निष्ठावंत व कार्यक्षम अधिकारी असलेले डॉ.किरण आर.नायक यांच्यावर कोणताही तपास न करता बिनबुडाचे खोटे आरोप केले होते . किरण नायक यांना निलंबित करण्यात आले. याविरोधात डॉ. किरण नायक यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने युक्तिवाद ऐकून डॉ. किरण नायक याना सर्व आरोपातून निर्दोष मुक्त करण्यात आले कारण त्याच्यावरील आरोपांसाठी कोणताही आधार किंवा पुरावा नव्हता. आणि कर्नाटक सरकारच्या गृह विभागाने काढलेला निलंबनाचा आदेश रद्द करण्यात आला आहे. याशिवाय गृह विभागाचे सचिव आणि होमगार्डचे डीजीपी यांना त्यांच्या पूर्वीच्या पदावर पुन्हा नियुक्त करण्याचे निर्देश दिले आहेत.

माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबाबत डॉ. किरण नायक यांनी आभार मानले. आणि खोटे आरोप करणाऱ्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर मानहानीचा गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती डॉ. किरण नायक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

Tags: