Belagavi

चंदुकाका सराफ ज्वेल्स् च्या बेळगांव सुवर्ण दालनाचा शानदार शुभारंभ संपन्न

Share

1827 पासून परंपरा, शुद्धता, विश्वास,पारदर्शकता,नाविन्यता या पंचसूत्रांवर आधारित विश्वास संपादन केलेल्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांच्या बेळगांव सुवर्ण दालनाचा भव्य शुभारंभ बुधवार दि. ९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी 11 वाजता आमदार अभय पाटील, आमदार राजू सेठ ,

माजी आमदार संजय पाटील, बेळगांवचे उप महापौर आनंद चव्हाण, अग्रगण्य उद्योजक डॉ. रमेश आणि सावित्री दोड्डण्णावर आणि चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक अतुल जिनदत्त शहा, संगिता अतुल शहा यांच्या शुभहस्ते व श्री. सिध्दार्थ अतुल शहा, आदित्य अतुल शहा, साहस बागी व अन्य मान्यवर यांच्या उपस्थितीत हनुमान मंदिर, खडे बाजार, बेळगांव येथे संपन्न झाला.

उद्घाटनानिमित्त चंदुकाका सराफ ज्वेल्स् यांनी अनेक आकर्षक ऑफर्स जाहीर केल्या असून ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बेळगांव वासियांना केले आहे. उद्घाटनानिमित्त दिनांक ९ ऑक्टोबर ते ११ ऑक्टोबर या कालावधीत रू. १५,०००/- पासून पुढील दागिने खरेदीवर अनेक बक्षिसे ग्राहकांना मिळण्याची सुवर्णसंधी आहे. यामध्ये ६ लॅपटॉप, ३ स्कुटर, ६ मोबाईल तसेच रू. 3000 पासून योजनेतील गुंतवणुकीवर हमखास भेटवस्तू मिळणार आहेत.

यावेळी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, कृषी, पर्यटन आणि उद्योगांचे महत्वाचे केंद्र असलेल्या आधुनिकता, ऐतिहासिक, सांस्कृतिक, सहकार, धार्मिक वारसा लाभलेल्या बेळगांव शहरात सुरू होणाऱ्या चंदुकाका सराफ ज्वेल्स् च्या सुवर्ण दालनामुळे बेळगांवकरांना दागिने खरेदीसाठी उत्कृष्ठ पर्याय मिळला आहे. चंदुकाका सराफ व बेळगांवकर यांचे अतूट नाते निर्माण होईल.
बेळगाव उत्तरचे आ . आसिफ उर्फ राजू सेठ यांनी देखील चंदुकाका सराफ ज्वेल्स ला शुभेच्छा दिल्या . आणि नव्याने सुरु झालेल्या या नवीन सुवर्णपेढीच्या आकर्षक योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले .

माजी आ . संजय पाटील यांनी देखील चंदुकाका सराफ ज्वेल्स च्या बेळगावमधील नव्या दालनाला शुभेच्छा दिल्या . महाराष्ट्रासहित आता कर्नाटकात देखील या पेढीचा विस्तार होऊन ग्राहकांना चोख शुद्ध सोन्याचांदीचे दागिने देण्याची विश्वासार्ह परंपरा जपण्याच्या शुभेच्छा दिल्या .

यावेळी बोलताना चंदुकाका सराफ ज्वेल्स्चे संचालक अतुल शहा म्हणाले की, समृध्द आणि सुजलाम-सुफलाम बेळगांव शहरात पदार्पण करताना आमचा आनंद द्विगुणीत होत असून आता बेळगांवचे सौंदर्य अधिक खुलविण्यासाठी आम्ही आलो आहोत. चंदुकाका सराफ ज्वेल्स् च्या माध्यमातून बेळगांववासीयांना साजश्रृंगारासाठी आता उत्तमोत्तम आणि अभिनव पर्याय मिळणार आहेत. उद्घाटन समारंभ व योजनांचा लाभ समस्त बेळगांव वासीयांनी घ्यावा असे आवाहन संचालक श्री सिध्दार्थ शहा यांनी केले आहे

Tags: