97 व्या नाडहब्ब उत्सवाची सांगता पाचव्या दिवशी काव्यवाचनाने झाली. बेळगाव येथील कन्नड साहित्य भवनाच्या प्रांगणात सुरू असलेल्या 97 व्या नाडहब्ब उत्सवानिमित्त सोमवारी सायंकाळी कवी मैफल रंगली. लिंगराज महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ. बसवराज जगजंपी यांनी कविसंमेलनाचे उद्घाटन केले.
डॉ. जयनंद धनवंत, डॉ. हेमा सोनोल्ली, सुमा कित्तूर, सुनीता देसाई, अशोक मलगली, नदीम सनदी, शबाना अंनिगेरी, रवी हलकर्णी आणि इतर कवींनी आपल्या कवितांचे वाचन केले. अध्यक्षस्थानी अंजुमन महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.एच.आय.तीम्मापुर होते.
डॉ. एच.बी. राजशेखर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समारोपीय कार्यक्रमात कन्नड आणि संस्कृती विभागाच्या उपसंचालिका विद्यावती भजंत्री, सी.के. जोरापुरे, बसवराज सुनगार आदी उपस्थित होते.
निलगंगा चरंतीमठ, प्रिया पुराणिक, मधुकर गुंडेनाट्टी, शिरीष जोशी, निर्मला प्रकाश, बसवराज सुनगार यांचा सत्कार करण्यात आला.
नंतर सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
Recent Comments