Belagavi

नवरात्रोत्सवानिमित्त मेणसे गल्ली येथे महाप्रसादाचे आयोजन

Share

मेणसे गल्ली, बेळगाव येथे श्री सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे आज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बेळगावातील मेणसे गल्ली येथे श्री सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे रथारूढ श्री दुर्गादेवीची १२ फूट उंच मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी श्री दुर्गादेवीची आरती, विविध धार्मिक सेवा आणि संध्याकाळी दांडियाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. आज नवरात्रीच्या सहाव्या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

मेणसे गल्लीत श्री सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळातर्फे गेल्या ५ वर्षांपासून श्री दुर्गादेवीची प्रतिष्ठापना केली जात असून, गेल्या तीन वर्षांपासून महाप्रसादाचे आयोजन केले जात आहे. या वेळी येळ्ळूरचे शिल्पकार मनोज जाधव यांनी साकारलेल्या आकर्षक रथारूढ दुर्गादेवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली असून सालाबादप्रमाणे यंदाही महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सागर केलगेरी यांनी या उपक्रमाबद्दल अधिक माहिती दिली आहे.

मेणसे गल्लीतील व्यापारी, रहिवासी व ज्येष्ठांच्या सहकार्याने नवरात्रोत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो. ही विशेष सेवा ९ दिवस चालणार असल्याची माहिती येथील ज्येष्ठ नागरिकाने इन न्यूज शी बोलताना दिली.  कामत गल्ली, आझाद गल्ली, रविवार पेठ, पांगुळ गल्ली, माळी गल्ली, भोई गल्ली, बुरुड गल्ली, भातकांडे गल्लीसह अनेक भाविकांनी हजारोंच्या संख्येने भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.

Tags: