बेळगाव हिंडलगा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या लक्ष्मी नगर येथील श्री महालक्ष्मी मंदिरात सालाबाद प्रमाणे नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .
सालाबाद प्रमाणे श्री महालक्ष्मी मंदिर लक्ष्मी नगर हिंडलगा येथे नवरात्रोत्सवानिमित्त दररोज श्री महालक्ष्मी देवीची विविध रूपात आरास करण्यात येत आहे. देशभरात असणाऱ्या शक्तीपीठांच्या स्वरूपातील आरास नवरात्रीच्या निमित्ताने श्री महालक्ष्मी देवीला करण्यात येते. याच प्रमाणे श्री दुर्गामाता दौड, महाआरती, सहस्त्रनाम यासारखे विविध धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मंदिरात आयोजित करण्यात येत आहेत, यंदा बेळगाव लोकसभा मतदारसंघाचे खासदार जगदीश शेट्टर यांच्या हस्ते विशेष पूजा करण्यात आली,
हा नवरात्र उत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी देवस्थान ट्रस्ट कमिटी ग्रामस्थ महिला मंडळ यांचे विशेष सहकार्य लाभते, नवरात्रोत्सवाच्या दरम्यान देवीची विशेष आरास सौ. लक्ष्मी दत्ताजी कानूरकर यांच्या नेतृत्वाखाली विविध महिलांच्या सहकार्याने साकारण्यात येते. आकर्षक आरास आणि मंदिराची सजावट पाहण्यासाठी तसेच देवीचे दर्शन घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी दाखल होतात.
Recent Comments