Belagavi

अंगणात उभ्या केलेल्या नवीन गाडीवर अज्ञातांकडून दगडफेक

Share

इतके दिवस चोरांना कंटाळलेली वडगावमधील जनता आता बदमाशांच्या कृत्याने हैराण झाली आहे. रात्री अंगणात उभ्या केलेल्या नवीन गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे .

व्हॉइस ओव्हर : काही दिवसांपूर्वी बेळगावच्या वडगावमध्ये चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. आता ह्या घटना या आटोक्यात आल्या असतानाच बदमाशानी गाडीवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. काल रात्री वडगाव येथील , छत्रपती संभाजी नगर येथील गणेश कॉलनी फर्स्ट क्रॉस येथे , घरासमोर उभ्या असलेल्या कारवर दगडफेक करण्यात आली.

आपले हे कृत्य येथील सीसीटीव्हीत दिसू नये म्हणून बदमाशानी अतिशय हुशारीने हे कृत्य केल्याचा संशय कार मालक प्रथमेश मनोज काळे यांनी व्यक्त केला असून येथील रिकाम्या जागेतून ते पळून गेले. 4-5 महिन्यांपूर्वीच नवीन कार घेतली होती. काल रात्रीच गाडी अंगणात उभी होती. असे प्रकार रोखण्यासाठी शहापूर पोलिसांनी दररोज पेट्रोलिंग येथे यावे, अशी मागणी कारमालक प्रथमेश मनोज काळे व शंकर गौडा यांनी केली आहे. संबंधित शहापूर पोलीस ठाण्याने गैरप्रकार करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी येथील नागरिकांमधून करण्यात येत आहे .

Tags: