भुवनेश्वरी देवी कर्नाटकची माता घोषित करून सर्व सरकारी कार्यालयांमध्ये राज्यमाता म्हणून भुवनेश्वरीची प्रतिमा लावण्याची मागणी बेळगावच्या सर्वोदय सेवा संघाने केली आहे. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात सर्वोदय स्वयंसेवा कन्नड संघटनेच्या वतीने उपरोक्त मागणीचे निवेदन सादर करण्यात आले.
बेळगावातील कन्नड समर्थक संघटनांनी बेळगावच्या हिवाळी अधिवेशनात राजधानी बेंगळुरू येथील विधानधसमोर राज्यमाता श्री भुवनेश्वरी देवीचा कांस्य पुतळा बसविण्याची मागणी केली होती. त्याला प्रतिसाद देत सरकारने पुतळा बसवण्यासाठी पुढाकार घेतला असून आता यानुसार भुवनेश्वरी देवी कर्नाटकची माता घोषित करून सर्व सरकारी कार्यालयांमध्ये राज्यमाता म्हणून भुवनेश्वरीची प्रतिमा लावण्यात यावी, अशी मागणी संघटनेचे अध्यक्ष श्रीनिवास ताळूकर यांनी केली.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
Recent Comments