बेळगाव हे सांस्कृतिक शहर आहे. अनेक वर्षांचा वारसा आजपर्यंत चालवणारे शहर. नवरात्रीनिमित्त श्री दुर्गा माता दौडच्या माध्यमातून देशाची संस्कृती आणि राष्ट्रभक्ती जतन करण्याचे कार्य येथील तरुणांनी सुरू ठेवले आहे. श्री स्कंद मातेच्या पूजनाने आज श्री दुर्गामाता दौडचा 5 वा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
देव, देश आणि धर्म जागृतीचा संदेश देत श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दरवर्षीप्रमाणे बेळगावात अखंड श्री दुर्गा मातादौडचे २६ वे वर्ष सुरु आहे . आज श्री दुर्गामाता दौडच्या पाचव्या दिवसाची सुरुवात छत्रपती शिवाजी कॉलनी, टिळकवाडी, बेळगाव येथून श्री स्कंद मातेच्या पूजेने झाली. श्री दुर्गामाता दौडची सूर्यवंत प्रेरक मंत्राने धर्मध्वज फडकावून करण्यात आली . प्रत्येक गल्ली नववधूसारखी सजली होती. दौडीत विविध घोषणा देत हिंदू धर्म आणि संस्कृतीचा जागर करण्यात आला . सुवासिनींनी आरती करून दौडचे स्वागत केले. आबालवृद्धांनी भगवा फेटा , पांढऱ्या रंगाच्या वेशभूषा करून दौडीत मोठ्या संख्येने सहभाग घेतला . बाळ शिवाजी , भवानी माता , छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिवंत रूपकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले, धारकऱ्यांवर पुष्पवृष्टी करण्यात आली.
दौडची सुरुवात , छत्रपती शिवाजी कॉलनी, टिळकवाडी येथून झाली. त्यानंतर , एम जी रोड ,महर्षी रोड, नेहरू रोड, पहिले रेल्वे गेट, गोवावेस जलतरण तलाव, सोमवार पेठ, आरपीडी क्रॉस, खानापुर रोड, अनगोळ हरिमंदिर, चिदंबरनगर, हदुगेरी, कुरबर गल्ली, रघुनाथ पेठ, भांदुर गल्ली, नाथ पै नगर, बनले गल्ली मार्गे लक्ष्मी गल्लीत पोहोचून श्री लक्ष्मी मंदिरात पूजा करून दौडची सांगता करण्यात आली .
दुर्गा माता दौड ही महिलांसाठी प्रेरणा आणि त्यांच्या शक्ती जागृत करणारे दैवी तेज आहे. त्यामुळे अधिकाधिक महिलांनी श्री दुर्गामाता दौडीत सहभागी व्हावे , असे मत प्रभा महेश शिंदे या महिलेने व्यक्त केले . आपल्या ८ महिन्यांच्या बाळाला घरी सोडून त्या दौडीत सहभागी झाल्या होत्या .
पूर्वा अभिजीत भोसले यांनी इन न्यूजशी बोलताना, नावाप्रमाणेच, आम्ही भोसले घराण्यातील आहोत, ज्यांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांचे आडनाव लाभले आहे . आणि हिंदवीस्वराज्याचा वारसा चालू ठेवणे हे आपले कर्तव्य आहे . आपला देश आणि संस्कृती वाचवण्यासाठी आणि विकसित करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे चालवायला हवेत, असे त्या म्हणाल्या .
भूषण मारुती निर्मळकर यांनी दौडचे महत्त्व सांगितले.
श्री दुर्गामाता दौडची सुरुवात उद्या मंगळवारी खासबाग येथील श्री बसवेश्वर सर्कलमधून होणार आहे. भारतनगर, नाथ पै सर्कल, बाजार गल्ली, रयत गल्ली, सपार गल्ली, दत्त गल्ली, सोनार गल्ली, वडगाव मेनरोड, तेंगिन गल्ली, जुने बेळगाव रोड, कुलकर्णी गल्ली, छत्रपती संभाजी गल्ली, लक्ष्मी मंदिर, रामदेव गल्ली, वडगाव गल्ली. नाझर कॅम्प, हरिजन वाडा, हरिमंदिर, वझे गल्ली, धामणे रोड, विष्णुगल्ली, कारभार गल्ली, आनंदनगर, संभाजी नगर, पाटील गल्ली मार्गे श्री मंगाई मंदिर येथे समाप्त होईल.
Recent Comments