लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या सौंदत्ती येथील श्री रेणुका देवी मंदिराला आमदार विश्वास वैद्य यांनी अचानकपणे भेट दिली. यावेळी येथील नियोजनाचा अभाव पाहून अधिकाऱ्यांना त्यांनी खडेबोल सुनावले.
या देवस्थानात बारमाही भाविकांची मोठी गर्दी असते. यात्राकाळासह नवरात्रोत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक यल्लम्मा डोंगरावर दर्शनासाठी जातात. मात्र देवस्थान परिसरात दिसून येणारी अस्वच्छता, अयोग्य नियोजन हि परिस्थिती पाहून आमदार विश्वास वैद्य यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले.
या देवस्थानात कर्नाटकासह परराज्यातूनही लाखो भाविक दर्शनासाठी येतात. मात्र अस्वच्छतेसह अनेक गैरसोयी याठिकाणी उद्भवल्यामुळे भाविकांची गैरसोय होते. जर अधिकारी वेतन वेळेत आणि योग्य घेत असतील तर काम करायला टाळाटाळ का केली जाते? असा जाब त्यांनी अधिकाऱ्यांना विचारला. ठिकठिकाणी साचलेला कचरा, ड्रेनेजची अव्यवस्था यामुळे नागरिकांचे हाल होत असून तातांदूने भाविकांच्या सोयीसाठी योग्य ती व्यवस्था करावी, असा इशारा त्यांनी अधिकाऱ्यांना दिला.
Recent Comments