महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शनिवारी मुतगा गावातील पाटील व गोकुळ शहरातील सीसी रस्ता बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने मला राज्याचे मंत्रिपद मिळाले आहे. तुमची सेवा करण्याची संधी मला मिळाली असून मूलभूत सुविधांबरोबरच विकासासाठी अनेक कायमस्वरूपी प्रकल्प आणण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे त्या म्हणाल्या.
यावेळी श्याम मुतगेकर, स्नेहल पुजेरी, गजू कणबरकर, भीमसेन ओबन्नागोळ , कृष्णा, पिंटू मल्लवगोळ, पिंटू पुजेरी, विनायक पुजेरी, सोमू सनमणी, नागेशण्णा देसाई, एच.आर.नांदुरकर, व्यंकटेश थिगडी, रमेश थोटगी, ज्योतिबा मोटारकर, ज्योतिबा कोळगावकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
या दरम्यान, मंत्री हेब्बाळकरांनी मुतगा गावातील साई नगर येथे उभारण्यात येत असलेल्या श्री साई मंदिर इमारतीच्या प्रगतीची पाहणी देखील केली.
Recent Comments