1 नोव्हेंबर रोजी यावेळी बेळगावात केवळ राज्योत्सव मिरवणूक न ठेवता भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे, अशी मागणी कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायण गौडा गटाकडून करण्यात आली आहे.
शनिवारी राणी चन्नम्मा सर्कल येथून बेळगाव कर्नाटक रक्षण वेदिकेच्या नारायणगौडा गटाच्या वतीने निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
दरवर्षी 1 नोव्हेंबर रोजी भव्य राज्योत्सव मिरवणूक आयोजित केली जाते. मात्र शहरातील सरदार मैदानावर भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. दावणगेरे, हुबळीप्रमाणे बेळगावातही कार्यक्रम आयोजित केले तर येथील कन्नडिगांना बळ मिळेल, असे महादेव तलवार यांनी सांगितले.
यावेळी बेळगाव जिल्हा रुग्णालयाच्या कारभाराबाबतही निवेदन सादर करण्यात आले. गरीब रुग्णांवर उपचार न करता त्यांना खासगी रुग्णालयात जाण्यासाठी दबाव टाकला जात आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.
यावेळी करवे नारायण गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
Recent Comments