Hukkeri

हुक्केरी हिरेमठ येथे दसरा कार्यक्रम

Share

नवरात्रोत्सवाच्या काळात देवी जागृत होते आणि भक्तांच्या सर्व मागण्या पूर्ण करते असे पुराण प्रवीण हुणशाळ निजगुणदेव महास्वामी म्हणाले.

हुक्केरी हिरेमठच्या दसरा कार्यक्रमात सहभागी होऊन आज ते बोलत होते. दसरा उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी कोन्नूर येथील पावडेश्वर महास्वामी यांच्या उपस्थितीत तालुका दंडाधिकारी सौ.मंजुळा नायक यांच्या हस्ते दसरा महोत्सवाला सुरुवात झाली.

या कार्यक्रमात निडसोशी मठाचे पंचम शिवलिंगेश्वर महास्वामी, कटकोळ चंदरगीचे वीरभद्र महास्वामी आणि विरक्त मठाचे शिवबसव स्वामी यांच्या उपस्थितीत माजी आमदार बी सी सारीकर यांच्या हस्ते नऊ दिवस चालणाऱ्या गुड्डापूर दानम्मा माहात्म्य प्रवचनाला सुरुवात झाली. हुक्केरी हिरेमठ येथील चंद्रशेखर महास्वामी पुराण प्रवीण हुणशाळ निजगुणदेव महास्वामी यांचा सत्कार केला.

यावेळी बोलताना निजगुण महास्वामीयांनी सांगितले की, नवरात्रीच्या दिवसांमध्ये देवी जागृत असते आणि भक्तांच्या मागण्या पूर्ण करते.  व्यासपीठावर पोलीस निरीक्षक महांतेश बसापुरे, नगराध्यक्ष इम्रान मोमिन, परगौडा पाटील, महावीर निलजगी, चन्नाप्पा गजबर, शिक्षक सी.एम. दरबरे, सुरेश जिनराळे, सुभाष नाईक आदी उपस्थित होते. यावेळी शेकडो भाविकांनी सहभाग घेतला होता.

Tags: