Belagavi

कर्नाटक राज्याच्या ऐतिहासिक सणात मोठ्या संख्येने सहभागी व्हा : खास. शेट्टर

Share

कर्नाटक राज्यात ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या दसरा सणाच्या उत्सवात मोठ्या संख्येने सहभागी होऊन आपला सांस्कृतिक वारसा जपावा असे आवाहन बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर यांनी केले.

दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव येथील कित्तूर राणी चन्नम्मा सर्कल येथील कन्नड साहित्य भवनच्या प्रांगणात श्री भुवनेश्वरी मातेच्या प्रतिमेचे पूजन करून ९७ व्या नाडहब्ब महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. जगद्गुरू डॉ. सिद्धराम महास्वामी यांच्या अध्यक्षस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी नाडहब्ब समितीच्या मानद अध्यक्षा व माजी खासदार मंगला अंगडी, ज्येष्ठ साहित्यिक प्रा. बसवराज गवीमठ, नाडहब्ब समितीचे अध्यक्ष डॉ. एच. बी राजशेखर, खजिनदार व्ही. के. पाटील, सरचिटणीस डॉ. सी.के. जोरापुर, उपाध्यक्ष आर. पी पाटील, श्रीमती सुजाता उल्लाळ, सचिव डॉ. एच. आय थिम्मापूर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे खासदार जगदीश शेट्टर उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, नाडहब्ब म्हणजेच कर्नाटकाचा सण असणाऱ्या दसरा महोत्सवात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून, आपली संस्कृती व वारसा आपण जपला पाहिजे. विश्व कन्नड संमेलनासारख्या कन्नड समर्थक कार्यक्रमांमध्ये नागनूर रुद्राक्षी मठ प्रमुख आहे. देशातील प्रत्येक राज्यात हा उत्सव वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कर्नाटकातील विजयनगर राज्याचा राजा श्री कृष्ण देवरायाने हा सण नाडहब्ब म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली, अशी माहिती त्यांनी दिली.

ज्येष्ठ लेखक सी.के. जोरापुरे बोलताना म्हणाले, यापुढे धर्माने जगात शांतता नांदली पाहिजे. नाडहब्बला स्वतःचा इतिहास आहे. आपल्या राज्याचा गतवैभव सांगणारा हा सण असून लक्ष्मी सरस्वती आणि श्री भुवनेश्वरीच्या पूजेबद्दल, त्यांनी माहिती दिली.

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने मान्यवर सहभागी झाले होते.

Tags: