Belagavi

धारवाड येथून विक्रीसाठी आणलेला गांजा बेळगाव पोलिसांनी केला जप्त

Share

बेळगाव तालुक्यातील कबलापुर गावात गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात बेळगाव सीईएन पोलिसांना यश आले आहे.

धारवाड सत्तूर निवारा कॉलनीत राहणारा समीर राजेसाब लथेम्मा हा बेळगाव तालुक्यातील कबलापूर गावातील कल्याळ पूलजवळ गोकाका-बेळगाव रस्त्यावर गांजा विकण्यासाठी आला होता. बेळगाव शहर पोलीस आयुक्त आणि कायदा व सुव्यवस्था विभागाच्या डीसीपींच्या मार्गदर्शनाखाली सीईएन पोलिसांनी आरोपीला अटक करून 1 लाख 20 हजार रुपये किमतीचे 1 किलो 22 ग्रॅम गांजा जप्त केला असून त्याच्याकडे असणारी एक दुचाकीही ताब्यात घेतली आहे.

बेळगाव शहर सीईएन गुन्हे पोलीस अधिकारी एसीपी जे. रघु यांच्यासह पीआय बीआर गड्डेकर, पीएसआय विश्वनाथ घंटामठ व कर्मचाऱ्यांचा या कारवाईत सहभाग होता.

Tags: