Belagavi

अखेर डीसीसी बँक अध्यक्षपदाचा कत्तींनी दिला राजीनामा

Share

माजी खासदार रमेश कत्ती यांनी बेळगावच्या डीसीसी बँकेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने बेळगावमधील सहकार क्षेत्रासह एकंदर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रमेश कत्ती आणि अण्णासाहेब जोल्ले लोकसभा निवडणुकीतील लढतीचा डीसीसी बँकेच्या कारभाराशी काहीही संबंध नाही असे वक्तव्य रमेश कत्ती यांनी नुकतेच केले होते. मात्र रमेश कत्ती यांच्याविरोधातील १४ संचालकांच्या नाराजी नाट्यामुळे अखेर त्यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. डीसीसी बँकेचे 14 संचालक नाराज असल्याने त्यांनी बैठकीला अनुपस्थिती दर्शविली होती. नाराज संचालकांनी रमेश कत्ती यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्याचा निर्णय घेतला होता अशी माहिती उपलब्ध होताच रमेश कत्ती यांनी राजीनामा दिला आहे.

Tags: