सरकारने कितीही स्वच्छतेचे कार्यक्रम राबवले तरी जनजागृतीचा अभाव असल्याने अनेक ठिकाणी कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असून याचा प्रत्यय बेनकनहळ्ळी मार्गावर येत आहे.
रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढिगारे…कुत्र्यांचा वावर.. दुर्गंधीचे साम्राज्य हे विदारक चित्र बेनकनहळ्ळी भागाला जोडणाऱ्या रस्त्यावरील आहे. या रस्त्याला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. मुख्य मार्गावर पसरलेल्या कचऱ्यामुळे कुत्र्यांचा उपद्रव वाढला असून याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.

या भागातून जाणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होत असून ग्रामपंचायतीने या समस्येकडे गंभीर दुर्लक्ष केले आहे. हि समस्या तातडीने सोडविण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments