Vijayapura

विजयपूर : अखेर बिबट्या जेरबंद … वनविभागाच्या कारवाईचे कौतुक

Share

विजयपूर जिल्ह्यातील अलामेल तालुक्यातील सोमजाळ गावात एका शेतकऱ्याच्या शेतात दबत्याला जेरबंद करण्यात आले आहे.

बिबट्याचा वावर होत असल्याचे समजताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र भीती निर्माण करणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. काल सकाळी सोमजाळ परिसरात आढळलेल्या बिबट्याला 24 तासात पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले.

ही कारवाई सिंदगी प्रादेशिक वनविभागाचे प्रादेशिक वनाधिकारी राजीव बिरादार यांच्या देखरेखीखाली उपविभागीय वन अधिकारी प्रियंका, एस.एस.बिरादार यांच्या नेतृत्वाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी चन्नूर व शिवानंद मडगोंड व कर्मचाऱ्यांनी केली. वनविभागाच्या कामाचे ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

Tags: