विजयपूरमध्ये महानवमी अमावास्येनिमित्त हजारो भाविकांच्या उपस्थितीत कडुलिंबाच्या झाडाची पूजा केली जाते. मात्र यादरम्यान कडुलिंबाच्या झाडातून दुधाळ स्त्राव निदर्शनात आल्यामुळे नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात होते.
यात्रेप्रमाणे गर्दीचे स्वरूप प्राप्त झालेल्या या भागात हे दृश्य पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली. विजयपूरमधील गलगली या भागात हा सर्व प्रकार घडला असून शेतकरी, महिला यांच्यासह अनेकांनी हि दैवी शक्ती असल्याचे समजून झाडाची पूजाही केली. मात्र कडुलिंबाच्या झाडातून पाझरणारा दुधाळ स्त्राव हि नैसर्गिक प्रक्रिया असल्याचे वैज्ञानिकांचे मत आहे.
कडुलिंबाच्या प्रत्येक झाडातून दुधाळ स्त्राव वाहतो असे नाही परंतु काही विशिष्ट प्रजातींच्या कडुलिंबाच्या झाडातून दुधाळ स्त्राव होतो, असे विज्ञानाने या आधीही स्पष्ट केले आहे.


Recent Comments