Banglore

महात्मा गांधींना मुख्यमंत्र्यांनी केले अभिवादन

Share

आज देशभरात महात्मा गांधी जयंती साजरी केली गेली. याच पार्श्वभूमीवर बेंगळुरूमधील महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी आदरांजली वाहिली.

बेंगळुरूमध्ये, सीएम सिद्धरामय्या आणि डीसीएम डीकेशी यांनी गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. गांधी स्मारकाजवळ जमलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा देत विधानसौध येथील गांधी पुतळ्यापर्यंत भव्य मिरवणूक काढली. यावेळी आयोजित पदयात्रेत अनेकांनी गांधी टोपी घालून सहभाग घेतला.

यावेळी बोलताना डीसीएम डीके शिवकुमार म्हणाले की, महात्मा गांधी 1924 मध्ये बेळगाव येथे झालेल्या एआयसीसी अधिवेशनात सहभागी झाले होते. तिथून त्यांनी स्वातंत्र्यलढ्याचा बिगुल वाजवला. यंदा अधिवेशनाला १०० वर्षे पूर्ण होत असून अधिवेशनाच्या शतक महोत्सवानिमित्त सरकार पुढील एक वर्षासाठी नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबविणार आहे.

Tags: