Hukkeri

आशा मौनेश्वर – पोतदार यांना उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार

Share

राज्य शासनाच्या वतीने आंबेवाडी शासकीय वरिष्ठ प्राथमिक शाळेच्या कन्नड शिक्षिका सौ.आशा मौनेश्वर पोतदार यांना उत्कृष्ट शिक्षिका पुरस्काराने गौरविण्यात आले.

शहरातील केपीटीसीएल सभा भवन येथे कुडलसंगम पिठाचे जयमृत्युंजय महास्वामी आणि हुक्केरी विरक्त मठाचे शिव बसवा महास्वामी यांच्या प्रमुख उपस्थितीत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिक्षण विभागाचे सहसंचालक मोहन हंचाटे आदींसह विविध मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी आशा मौनेश्वर – पोतदार या दाम्पत्याचा सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.

कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे बेळगाव जिल्हाध्यक्ष जयकुमार हेबळी यांनी आशा पोतदार यांच्या कार्याचे वर्णन केले. बेळगाव मधील सरकारी मॉडेल कन्नड वरिष्ठ प्राथमिक शाळा क्र. 21 हि शाळा त्यांनी दत्तक घेतली असून यंदा स्वखर्चातून एलकेजी, यूकेजी सुरु करण्यात आली आहे. शिवाय अनेक गरीब विद्यार्थ्यांना त्यांनी आर्थिक सहकार्य देखील केले आहे. आपल्या पगारातील निम्मी रक्कम त्यांनी अशा शैक्षणिक उपक्रमासाठी राखून ठेवत शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचे काम केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांना सर्वोत्कृष्ट शिक्षिका पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्याचे ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना आशा पोतदार यांनी सर्वांचे आभार मानत गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आपण सर्वतोपरी सहकार्य करत असल्याचे त्यांनी सांगितले.

व्यासपीठावर माजी मंत्री शशिकांत नायक, जयकुमार हेबळी, एस.डी.दासप्पनवर, राज्याचे प्रधान सचिव चंद्रशेखर नुगली, रवी भजंत्री, गौडप्पागौडा पाटील, रमेश गोनी, चांदणी कलाल, मायलन होरकेरी, लीलावती शिरण्णा, कर्नाटक राज्य प्राथमिक शाळा शिक्षक संघ, बेळगाव जिल्हा युनिट, ग्रामीण युनिटचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षिका आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Tags: