Belagavi

आमदार राजू सेठ यांच्या हस्ते स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा शुभारंभ

Share

महात्मा गांधी जयंतीनिमित्त आमदार राजू सेठ यांनी स्वच्छता ही सेवा उपक्रमाचा शुभारंभ केला.

जिल्हा प्रशासन आणि महानगर पालिकेच्या वतीने स्वच्छता ही सेवा – २०२४ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. कुमार गंधर्व नाट्यगृहात महापौर सविता कांबळे व आमदार राजू सेठ यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

कार्यक्रमात आमदार राजू सेठ यांच्या हस्ते नागरी कामगारांचा गौरव करण्यात आला. त्याचबरोबर विविध खेळात सहभागी झालेल्या खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला अशोक दुडगुंटी, नगरसेवक, नगरसेविका आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते

Tags: