बेळगाव शहरात महालय अमावस्येनिमित्त भुकेल्यांना अन्नदान करण्याचे तत्वज्ञान सांगणाऱ्या संत जलाराम यांच्या भक्तांनी अन्नदानाचे आयोजन केले होते.
नरगुंदकर भावे चौकातील श्री दत्त मंदिर व संत जलराम श्रद्धा स्थान येथे बुधवारी महालय अमावस्येनिमित्त अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते.

दर गुरुवारी दत्त मंदिरात आरतीनंतर तीर्थप्रसादाचे वाटप करणाऱ्या संत जलराम यांच्या भक्तांकडून अमावस्येसह विशेष दिवशीही महाप्रसादाचे वाटप केले जाते.. कन्नूभाई ठक्कर आणि प्रकाश कुलकर्णी यांनी या उपक्रमाबद्दल माहिती देताना सांगितले कि, भुकेल्यांना अन्नदान करण्याचे तत्व सांगणारे संत जलरामाचे भक्त आजही ते नियम पाळून अन्नदान करत आहेत.
या अन्नदानाचा शेकडो नागरिकांनी लाभ घेतला.


Recent Comments