Belagavi

एआयसीसी शतक महोत्सव : हिरेबागेवाडी येथे ‘गांधी पदयात्रा’

Share

१९२४ मध्ये झालेल्या एआयसीसी अधिवेशनाच्या शताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकार आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित राज्यव्यापी कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील हिरेबागेवाडी येथे गांधी पदयात्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कार्यक्रमात हजारो लोक सहभागी झाले होते. हिरेबागेवाडी येथील चावडीकूट येथील श्री लक्ष्मीदेवी मंदिरापासून ही रॅली निघाली. फडीबसवेश्वर मंदिरापर्यंत रॅलीची सांगता झाल्यानंतर रॅलीचे सभेत रूपांतर झाले. बंगळुरूमध्ये आज झालेल्या शपथविधी सोहळ्याला झूमच्या माध्यमातून हजेरी लावली होती.

Tags: