Belagavi

मंत्री सतीश जारकीहोळी यांची हारुगेरीच्या वसतिगृहाला भेट

Share

मंत्री सतीश जारकीहोळी यांनी रायबाग तालुक्यातील हारुगेरी येथील डॉ. बी.आर. आंबेडकर शासकीय मॅट्रिकोत्तर मुलांच्या वसतिगृहाला भेट दिली. या वसतिगृहाची पाहणी केल्यानंतर विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, मुलांच्या आरोग्याची माहिती घेतल्यानंतर योगाचे फायदे आणि तोटे याबाबत चर्चा केली. त्यानंतर मंत्री महोदयांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधून सर्व समस्या विचारून तत्काळ समस्या सोडविण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या. शिक्षणाचा गांभीर्याने विचार करून नीट अभ्यास करून उत्तमोत्तम यश मिळवा असे आवाहन मंत्री सतीश जारकीहोळी यांनी विद्यार्थ्यांना केले.

Tags: