होसूर, हुक्केरी येथे काल रात्री विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला असून यादरम्यान येथील जैन देवस्थानावर वीज कोसळून नुकसान झाले आहे.
होसूर गावातील 1008 पार्श्वनाथ जैन देवस्थानाच्या कळसाच्या भागावर वीज पडल्याने कळसाच्या काही भागाचे नुकसान झाले असून वरील बाजूच्या कमानींना तडे गेले आहेत. या देवस्थानाचा कळस दगडी असल्याने या कळसाचे नुकसान झाले नाही परंतु सिमेंटच्या कमानीला तडे गेले असून ग्रामस्थांकडून तातडीने डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.
Recent Comments