धारवाडमध्ये पहाटेपासूनच ढगाळ वातावरण होते, सायंकाळी वरुणरायाने आपली जोरदार हजेरी लावली . सायंकाळी पाऊस सुरू झाल्याने हुबळी धारवाड मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी पावसाचे पाणी शिरल्याने वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.
धारवाड येथील शहरात रविवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने घराकडे जाणाऱ्या वाहनधारकांना संघर्ष करावा लागत असल्याची परिस्थिती निर्माण झाली. धारवाड शहर KMF ने टोल नाक्याजवळ पावसाने थैमान घातले , अचानक सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावर पूर आला आणि वाहनधारकांची तारांबळ उडाली . .
काही वाहनधारक मुसळधार पावसाचा आसरा घेण्यासाठी जवळपासच्या दुकानांमध्ये गेले, तर हुबळी-धारवाड मुख्य रस्त्यावर काही वाहनधारक पावसात घर गाठण्यासाठी धडपड करीत असल्याची दृश्ये सर्रास पाहायला मिळत होती. वर्षाच्या आगमनाने काही शेतकरी सुखावला असला तरी. पावसामुळे काही शेतकरी चिंतेत होते.


Recent Comments