Belagavi

क्रांती महिला मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन

Share

बेळगावमधील क्रांती महिला मंडळ व उमा संगीत प्रतिष्ठान तर्फे कारगिल विजय व शिक्षक दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सेवानिवृत्त प्राध्यापिका प्रेमादेवी निंगाप्पा अन्नीगेरी यांची उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कारगिल युद्धाविषयी माहिती देत भारतीय संरक्षण विभागाला अधिक सहकार्य केले पाहिजे आणि संरक्षण दलाच्या गरजा वेळेवर पूर्ण केल्या पाहिजेत असे सांगितले. त्याचप्रमाणे शिक्षक-शिष्याचे नाते कसे असावे याबाबतही विचार मांडले.

क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत फाउंडेशनच्या वतीने कारगिलमधील सहभागी सैनिकांचा आणि अतिथी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या इंदिरा माणिक शंकरगौडा यांनी मुलांचे संगोपन आणि संस्कार याविषयी विचार मांडले. यावेळी बबन देसाई, संजू गौडा, बसवराज जिराळे, लक्ष्मी मास्के आदींसह उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

महिला मंडळाच्या अध्यक्षा मंगला मठद यांनी स्वागत केले तर भारती रत्नपगोळ यांनी प्रास्ताविक केले. शारदा नाट्यालयाच्या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गीतांवर नृत्य सादरीकरण केले. प्रीती कल्याण शेट्टी यांनी सूत्रसंचालन तर नमिता सोनटक्की यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी, आणि विविध मान्यवर उपस्थित होते.

Tags: