भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अथणीच्या फलोत्पादन विभागाच्या कार्यालयाची अस्वथ अत्यंत दयनीय झाली असून शेतकऱ्यांच्या समस्यांना चांगला प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांची निराशा झाली आहे.

शेकडो शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या अथणी येथील फलोत्पन्न विभागाच्या कार्यालयाची दुरवस्था भयाण झाली आहे. या कार्यालयात दारूची दुर्गंधी, आसपास परिसरात पसरलेले कचऱ्याचे साम्राज्य, यामुळे शेतकरी वर्गातून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. याठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी विश्रांतीसाठी जागा असूनही खुर्च्या नसल्याने शेतकऱ्यांना बसण्यासाठीही सोय उपलब्ध नाही.

कार्यालयाच्या दारात पान – गुटखा खाऊन भिंती आणि परिसर दुर्गंधीयुक्त झाला असून या कार्यालयाला वरिष्ठांनी भेट देऊन तातडीने समस्या सोडवाव्यात अशी मागणी होत आहे.


Recent Comments