अथणी मध्ये डोळ्यादेखत एका सराईत गुन्हेगाराने याचप्रकरणी एका तरुणाची फसवणूक करत रोकड लंपास केल्याची घटना घडली असून एटीएम वापरकर्त्यांना आता आपले एटीएम वापरताना सावध राहावे लागणार आहे.

अथणी येथील जंबगी येथे राहणाऱ्या तानाजी साळुंखे नामक युवकाची सरकारी रुग्णालयासमोर असणाऱ्या कर्नाटक बँकेच्या एटीएममध्ये फसवणूक करण्यात आली आहे याचठिकाणी असणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराने तब्बल १५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करून पोबारा केला आहे.
याप्रकरणी अथणी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली असून लवकरात लवकर चोराला पकडून झालेल्या नुकसानीची भरपाई करण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त तरुणाने केली आहे.


Recent Comments