हुबळी वीज पुरवठा कंपनीने ३० दिवसांत वीजबिल न भरल्यास ग्राहकाचे वीज कनेक्शन तोडण्यात येईल, असा डकड आदेश जारी केला आहे.
हेस्कॉमचा हा नवा कडक आदेश १ ऑक्टोबरपासून लागू होणार आहे. घरगुती, व्यावसायिक, अपार्टमेंट आणि तात्पुरत्या वीज जोडणीच्या ग्राहकांनी ३० दिवसांच्या आत बिल भरावे. अन्यथा दर महिन्याच्या पहिल्या १५ दिवस मीटर रीडिंगच्या दिवशी वीज कनेक्शन खंडित केले जाईल. आतापर्यंत वीजजोडणी बंद करण्यासाठी लाइनमनसह मीटर रीडर्स जात असत.
यापुढे मीटर रीडरशी संपर्क साधून बिलाची थकबाकी असल्यास वीज कनेक्शन तोडण्यात येणार आहे. पंधरा दिवसांत बिल न भरल्यास पुढील मीटर रिडिंगच्या दिवशी वीज जोडणी खंडित केली जाईल. हेस्कॉमने आपल्या घोषणेमध्ये म्हटले आहे की, विजेची थकबाकी आणि सुरक्षा ठेवीची रक्कम 100 रुपयांपेक्षा जास्त असल्यास अशा ग्राहकांचे वीज कनेक्शनही खंडित केले जाईल.


Recent Comments