बेळगाव मधील कित्तूर येथील कलमठ येथे जाणाऱ्या एका व्यक्तीला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने धारवाड येथील होयसाळनगर पुलाजवळ एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू तर आणखी एकजण गंभीर रित्या जखमी झाला आहे.
धारवाड राष्ट्रीय महामार्गावरील होयसाळनगर पुलावर हा अपघात झाला आहे. राणेबेन्नूर तालुक्यातील केरुरू गावातील सुलतानसाब मेदेरी याचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला संतोष थोडक्यात बचावला आहे. धारवाड वाहतूक विभाग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेत तक्रार नोंदवली आहे. या दुचाकीला एका लॉरीने मागून धडक दिल्याची माहिती मिळत आहे. यादरम्यान घटनास्थळी हजर असलेल्या नागरिकांनी जखमीला वाचविण्यासाठी प्रयत्न करत रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी धारवाड वाहतूक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments