Chikkodi

स्वच्छ आणि सुंदर वातावरण हेच आरोग्यदायी जीवन : महेश भाटे

Share

स्वच्छ वातावरण आणि सुंदर परिसर यामुळे निरोगी जीवन जगता येते, असे मत चंदरगी स्पोर्टस् स्कूलचे संचालक तथा माजी जिल्हा पंचायत सदस्य महेश भाटे यांनी व्यक्त केले.

चिक्कोडी येथील केएलई संस्थेच्या आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय व ग्रामपंचायत करोशी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वच्छ भारत जनजागृती रॅली व स्वच्छता कार्यक्रमाचा शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याप्रमाणे आपण आपले पर्यावरण स्वच्छ ठेवल्यास निरोगी राहू शकतो आणि स्वच्छतेतच देव शोधू शकतो, असे ते म्हणाले. चिक्कोडी येथे केएलईचे कार्याध्यक्ष डॉ.प्रभाकर कोरे यांनी दूरदृष्टीने आयुर्वेद महाविद्यालय सुरू केले. ते या भागातील विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. संतोष शिवण्णावर बोलताना म्हणाले, स्वच्छ स्वभाव स्वच्छ संस्कार या घोषवाक्यानुसार आयुष विभागाकडून गाव दत्तक घेऊन स्वच्छतेबाबत जनजागृती पदयात्रा काढण्यात येत असून यामागे लोकांना स्वच्छतेचे महत्व समजावून देणे हा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे फलक हातात घेऊन गाव स्वच्छतेविषयी जनजागृतीपर घोषणा दिल्या.यावेळी ग्रामपंचायत अध्यक्षा पंचाक्षरी हळीजोळे, उपाध्यक्ष कल्पना पवार, पंचायत विकास अधिकारी तन्वीर नायकवाडी, ग्राम पंचायतीचे सर्व सदस्य, चिक्कोडी केएलई आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ. होनवाड, डॉ. बी.बी.देसाई यांच्यासह डॉक्टर, विद्यार्थी, इतर कर्मचारी या सर्वांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महांतेश गुडनवर यांनी केले.

Tags: