Belagavi

धकाधकीचे जीवन मुलाच्या आत्महत्येचे कारण; मुलांना खेळांसहित अन्य कार्यात गुंतवा : शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन

Share

हल्ली धकाधकीच्या जीवनामुळे मुले आत्महत्येसारखा मार्ग पत्करत आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना निरोगी क्रीडा उपक्रमात सहभागी करून घेण्याचे आवाहन बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानियांग यांनी केले.

आयपीएलच्या धर्तीवर बेळगावात सुरू असलेल्या बेळगाव बॅडमिंटन लीगल स्पर्धेच्या तिसऱ्या आवृत्तीला आजपासून शानदार सुरुवात झाली. बेळगाव येथील महाबळेश्वर नगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये बॅडमिंटन खेळून शहर पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी स्पर्धेला सुरुवात केली.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी आनंद हावण्णावर, सोमशेखर खडबडी , सचिन इटगेकर, शिवाजी शिंदे, नौशाद विजापुरे, मंजुनाथ पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना शहर पोलिश कमिशनर याडा मार्टिन म्हणाले की, लहान लोकांची दृष्टी मोठी असते . तुमच्या जीवनात तसेच खेळात चांगले कौशल्य दाखवा. बेळगावची संस्कृती आणि क्रीडावृत्ती उत्तम आहे. पुढच्या पिढीला ते पुढे नेण्यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. निरोगी जीवनासाठी शिक्षणासोबतच खेळही महत्त्वाचा आहे.

प्रेरणा गमावल्यामुळे अनेक लोक अगदी लहान वयात आत्महत्या करतात हे दुर्दैवी आहे. लहान मुलांवर दबाव टाकल्याने अशा घटना घडत आहेत. त्यामुळे मुलांना विविध उपक्रमांमध्ये सहभागी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले.  हुक्केरी, निपाणी, संकेश्वर, खानापुर तालुक्यातील संघ सहभागी झाले होते.

Tags: