Belagavi

स्व. लता मंगेशकर स्मृतिदिनानिमित्त : ‘बेळ्ळीचुक्की’तर्फे लता लहरी

Share

बेळगावमधील बेळ्ळीचुक्की सांस्कृतिक अकादमी आणि कन्नड भवन यांच्या संयुक्त विद्यमाने गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त लता लहरी या बहारदार गाण्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बेळगावमधील नेहरू नगर येथील कन्नड भवनात हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. बेळ्ळीचुक्की सांस्कृतिक अकादमीच्या संस्थापिका – अध्यक्षा डॉ. राजेश्वरी हिरेमठ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन ऐतिहासिक कादंबरीकार य.रू पाटील, सुधीर कुलकर्णी, प्रतीक्षा हिरेमठ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

यावेळी अनेक कलाकारांनी गानकोकिळा लता मंगेशकर यांनी गायिलेल्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रम सादर करून श्रोत्यांची मने जिंकली.  याबाबत इन न्यूजला माहिती देताना बेळ्ळीचुक्की सांस्कृतिक अकादमीच्या संस्थापिका – अध्यक्षा डॉ. राजेश्वरी हिरेमठ म्हणाल्या, 14 भाषांमध्ये 50 हजारांहून अधिक गाणी गाऊन सर्वाधिक पारितोषिके मिळवणाऱ्या आणि भारताची कीर्ती जगभर पोहोचवणाऱ्या लता मंगेशकर यांच्या स्मृतिदिनाचा एक भाग म्हणून आयोजित केलेल्या लता लहरी कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.

या कार्यक्रमास ३०० हुन अधिक संगीतप्रेमींनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.

Tags: