Banglore

सीबीआय अधिकारावर मर्यादा हा योग्य निर्णय : गृहमंत्री

Share

केंद्र सरकारकडून राष्ट्रीय स्तरावरील तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याचा आरोप करत राज्य सरकारने सीबीआयला राज्यात थेट तपासासाठी असणाऱ्या अधिकारावर मर्यादा घातली असून सरकारचा हा निर्णय योग्य असल्याची प्रतिक्रिया गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी व्यक्त केली आहे.

बंगळुरूमध्ये प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, यापूर्वी अनेक राज्यांनी सीबीआयच्या ऐच्छिक तपासावर मर्यादा आणल्या आहेत. एखाद्या प्रकरणाचा तपास करण्यापूर्वी सीबीआयला राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार आहे.  माजी सभापती के. बी. कोळीवाड यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणारे विधान केले असून त्यांनी हे विधान कुणाच्या दबावाखाली येऊन केले आहे का? हि बाब शोधून काढणे गरजेचे आहे, असे मत गृहमंत्र्यांनी व्यक्त केले.

भाजपकडून आधीपासूनच मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असून यात नवीन काही नाही.. आता त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून लवकरात लवकर राजीनामा मिळावा यासाठी प्रयत्न सुरु केले असल्याचा टोलाही गृहमंत्र्यांनी लगावला. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: