आधुनिकीकरणाच्या युगात शारीरिक श्रमाशिवाय कामकाज करण्यात माणूस गुंतला असून यामुळे बहुसंख्य लोकांना हृदयविकाराने ग्रासले आहे. शरीरातील महत्वाचा अवयव असलेल्या हृदयाची निगा राखणे अत्यंत आवश्यक आहे अशी प्रतिक्रिया डॉ. प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केली.
जागतिक हृदय दिनाचा एक भाग म्हणून, आज केएलई संस्थेचे डॉ. प्रभाकर कोरे रुग्णालयाच्या कार्डिओलॉजी विभाग आणि रुग्णालयातील वैद्यकीय संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. धक्काधक्कीचे जीवन, मद्यपान आणि धूम्रपान पूर्णपणे टाळून हृदय निरोगी ठेवता येते. चांगल्या सवयी लावून आरोग्य चांगले ठेवा. मद्यपान आणि धूम्रपानामुळे हृदयविकाराला आमंत्रण मिळते, असे ते म्हणाले.
हृदयरोग विभागाचे प्रमुख डॉ. संजय पोरावाल म्हणाले की, डॉक्टरांकडे जाण्यापूर्वी प्रत्येकाने नियमित व्यायाम आणि आहारासह चांगली जीवनशैली अंगीकारून हृदयाचे आरोग्य राखण्याचा सल्ला दिला.
जेएन मेडिकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन.एस.महंतशेट्टी म्हणाले की, आधुनिक जीवनशैली, धक्काधक्कीचे जीवन, अत्याधुनिक आहार, आरोग्यास हानिकारक पदार्थ, पौष्टिक आहाराचा अभाव यामुळे हृदयविकारात वाढ होत आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखले पाहिजे. रोज किमान एक तास व्यायाम करणे आणि चालणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश पट्टेद, डॉ. विजयानंद मेटगुडमठ, डॉ. प्रसाद एम. आर., डॉ. समीर अंबर, डॉ. विश्वनाथ शेसमूर, डॉ. दानिश मेमुना आदी उपस्थित होते


Recent Comments