Belagavi

28 आणि 29 सप्टेंबर रोजी बेळगावात आयपीएल धर्तीवर बॅडमिंटन लीग स्पर्धा …

Share

तिसरी बेळगाव बॅडमिंटन लीग स्पर्धा 28 ते 29 सप्टेंबर दरम्यान शहरातील महाबळेश्वर नगर येथील बॅडमिंटन हॉलमध्ये आयोजित करण्यात आली येणार आहे .

शुक्रवारी बेळगावात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेच्या धर्तीवर बेळगाव बॅडमिंटन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. हुक्केरी, निपाणी, संकेश्वर आणि खानापुर तालुक्यातील संघ सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या स्पर्धेत 10 हून अधिक बॅडमिंटन संघ सहभागी होणार असल्याचे सोमशेखर खडबडी यांनी सांगितले. तसेच काही महिला बॅडमिंटन संघ सहभागी होणार आहेत. बॅडमिंटनच्या प्रत्येक संघासाठी 5000 रुपये प्रवेश शुल्क आहे. अंतिम फेरीतील विजेत्या संघाला १० हजार रु . रोख आणि ट्रॉफी आणि उपविजेत्या संघाला पाच हजार रु . रोख रकमेसहित आणि ट्रॉफी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सचिन इटगीकर, शिवाजीराव शिंदे, नौशाद विजापूर , मंजुनाथ पाटील आदी उपस्थित होते.

Tags: