Vijayapura

केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामींचा राजीनामा आधी घ्या : मंत्री एम बी पाटील यांचे आव्हान

Share

सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी करीत भाजपचे आंदोलन सुरु आहे . भाजपने आधी केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचा राजीनामा मागावा असे आव्हान मंत्री एम. . बी. पाटील यांनी भाजपला दिले.

काल संध्याकाळी विजयपुर येथे पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचं काय चुकलं? आम्ही प्राथमिक तपासाला आव्हान देतो. कोणत्याही फाईलवर सिद्धरामय्या यांची सही आहे का? मुडा प्रकरणात मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याबाबत काहीही झाले नाही. कुमारस्वामी, शशिकला जोल्ले , मुरुगेश निरानी आणि जनार्दन रेड्डी यांच्यावर प्राथमिक तपासासाठी परवानगी दिली आहे का, असे एम बी पाटील यांनी विचारले.

 

Tags: