बागलकोट जिल्ह्यातील हुनगुंद तालुक्यातील धन्नूर येथे कँटर आणि कार यांच्यात झालेल्या धडकेत चार जणांचा जागीच मृत्यू झाला. लक्ष्मण वड्डर (55), बैल्लाप्पा बिरादार (45), रामण्णा नायकमक्कलु (50) आणि कार चालक रफिक मुल्ला (25) यांचा मृत्यू झाला.
मृत हे विजयपूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील बिदरकुंडी गावातील आहे.
ही घटना पहाटे दोनच्या सुमारास घडली. गाडी मुड्डेबिहाकडे जात होती. कँटर मुद्देबिहाळ येथून हुनगुंदच्या दिशेने येत होता. यावेळी कार चालकाला झोप अनावर झाल्याने त्याने कँटरला धडक दिली. गाडीचा चुराडा झाला आहे. त्यामुळे चौघांचा जागीच मृत्यू झाला. हुनगुंद पोलिसांनी घटना घडलेल्या ठिकाणी भेट देऊन तपास केला.


Recent Comments