Banglore

माझा राजीनामा मागणाऱ्यांनी कुमारस्वामींचा राजीनामा आधी घ्यावा : मुख्यंमत्री

Share

मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, मी राजीनामा का देऊ, मी कायदेशीर लढा देईन, असा पुनरुच्चार मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला.

आज बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की मी काहीही चुकीचे केलेले नाही. गोध्रा हत्याकांडाच्या वेळी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीनामा दिला असता, कुमारस्वामी यांच्यावरदेखील आरोप असून जामिनावर बाहेर फिरणाऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळू शकते तर मी मुख्यमंत्रीपदावर राहण्यात लाज वाटण्यासारखी कोणती गोष्ट आहे? हे विचारण्याची नैतिकता भाजपकडे आहे का, असा सवाल सिद्धरामय्या यांनी केला.

मी कोणत्याही कारणास्तव राजीनामा देणार नाही. माझा राजीनामा मागणाऱ्यांनी कुमारस्वामींचा राजीनामा आधी मागावा. ते कोणाच्या मंत्रिमंडळात आहेत, कोणत्या पक्षाच्या सरकारमध्ये आहेत, त्यांनी आधी राजीनामा द्यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.

गोध्रा हत्याकांडात शेकडो लोकांचे प्राण गेले, मोदींनी स्वतः राजीनामा दिला नाही, मी काहीही चुकीचे केले नाही आणि राजीनामा देण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.

Tags: