Athani

अथणी येथील तहसीलदार कार्यालयासमोर ग्राम लेखापालांचे आंदोलन

Share

ग्राम लेखापालांनी हाताला काळे कापड बांधून अथणी येथील तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शने करत विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त केली. अथणी तहसीलदार सिद्राय भोसगे यांच्यामार्फत महसूलमंत्री कृष्णा भैरेगौडा यांना निवेदन दिले.

तीन प्रमुख मागण्यांसाठी राज्यभरात ९३६१ ग्राम लेखापालांनी आंदोलन केले. ग्रामप्रशासकीय अधिकाऱ्यांची पदे निश्चित करून तांत्रिक पदांच्या वेतनश्रेणीचे आदेश द्यावेत, तसेच सेवेच्या दृष्टीने मुलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, कामाचा ताण कमी करावा व वेतन वाढ करावी , या महत्त्वाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी ते बेमुदत संपावर गेले. .

दरम्यान, ग्राम लेखापाल मंजुनाथ पाटील व कल्लमेश कलमाडी म्हणाले की, आमची मागणी पूर्ण व्हावी यासाठी अनेक वर्षांपासून शासन दरबारी निवेदने देऊनही काही उपयोग झाला नाही, त्यामुळे प्रदेशाध्यक्षांच्या सूचनेनुसार आज आम्ही तालुका परिसरात शांततेत आंदोलन करत आहोत, सरकारने आमची मागणी त्वरित पूर्ण करावी अशी मागणी त्यांनी केली.

मातृ विभागाच्या सर्व कामांसह शासनाच्या आदेशानुसार सार्वजनिक क्षेत्रातील सेवांची दैनंदिन व इतर विभागांची विविध कामे करणाऱ्या आम्हाला सार्वजनिक क्षेत्रातील शेकडो सेवा उपलब्ध करून दयाव्यात . आमची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी, अशी विनंती त्यांनी सरकारला केली. .

Tags: