कडोली येथील प्राथमिक कृषी सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा आज पार पडली. पीकेपीएस अध्यक्ष गजानन कागणीकर यांच्या नेतृत्वाखाली सदर बैठक पार पडली.
यावेळी बोलताना पीकेपीएस अध्यक्ष गजानन कागणीकर म्हणाले की, कडोली गावातील पीकेपीएस ही खूप जुनी सहकारी संस्था आहे. या संस्थची सुमारे १ कोटी रुपयांची उलाढाल असून यंदा भागधारकांना ८.५ टक्के डिव्हीडंड जाहीर करण्यात आला आहे.

यावेळी संस्थेच्या उपाध्यक्षांनी सांगितले कि चालू वर्षात संस्थेच्या सभासदांच्या शेअरच्या पैशावर टक्केवारीनुसार लाभांश वितरित केला जाणार आहे.
यावेळी संस्थेचे संचालक, कर्मचारी, ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments