बेळगावात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने पुन्हा समस्या निर्माण झाल्या असून अनेक ठिकाणी पडझडीचे सत्र सुरु झाले आहे. कॅम्प परिसरात झाड कोसळून एक महिला जखमी झाली असून यामुळे वनविभागाविरोधात नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
बेळगाव शहरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. विजांचा कडकडाट आणि जोरदार वारा यामुळे अनेक ठिकाणी झाडे, खांब कोसळत आहेत. शहरातील कॅम्प परिसरात मंगेश होंडाच्या पाठीमागील घरावर पहाटेच्या सुमारास झाड पडल्याने घरातील एक महिला जखमी झाली. मागील वेळी याच महिलेच्या अंगणातील दत्त मंदिरावर फांदी पडून मंदिराचे व दुचाकीचे नुकसान झाले होते. यावेळी घरातील महिला विजया बडागावकर जखमी झाली असून छावणी परिषद – वनविभागाच्या विरोधात नागरिक संताप व्यक्त करत आहेत.
येथील दुकानावरही झाड पडून दुकानाचे नुकसान झाले असून दुकान मालक सुनील गोजे यांनी नाराजी व्यक्त केली.

येथील धोकादायक झाडे हटवण्यासाठी छावणी परिषद – वनविभागाला अनेकवेळा विनंती करूनही उपयोग झाला नाही. विद्यार्थी, मंदिरात येणारे भाविक यासह अनेक नागरिकांची मोठी वर्दळ असल्याने नागरिकांना कोणतेही नुकसान होण्याआधी समस्या सोडविण्याचे आवाहन केले जात आहे.
कोणताही मोठा अनर्थ घडण्यापूर्वी हि समस्या सोडविण्यात यावी, याकडे छावणी परिषद – वनविभागाने लक्ष पुरवावे अशी मागणी करण्यात येत आहे.


Recent Comments